बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताने डावललेल्या ‘या’ खेळाडूची तुफान फटकेबाजी, 63 चेंडूत कुटल्या 90 धावा; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी अनेक खेळाडू कठीण मेहनत घेत असतात. परंतु सगळ्याच खेळाडूचं भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पुर्ण होत नाही. अशातच 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदला भारतीय संघात संधी मिळाली नाही आहे. त्यानंतर त्याने अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील क्रिकेट संघात जबरदस्त फलंदाजी करत त्याने आपल्या संघाला 9 गडी राखून विजय मिळवून दिला आहे.

भारताने 2012 साली 19 वर्षाखालील विश्वचषक उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यावेळी चंदने अंतिम सामन्यात 111 धावांची जबरदस्त खेळी केली होती. उन्मुक्त चंदला भारताच्या संघात खेळण्याची संधी न मिळाल्यानं अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. सध्या अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सकडून उन्मुक्त चंद खेळत आहे.

उन्मुक्त चंदने शिकागो ब्लास्टर्सविरूद्ध खेळताना तुफान फटकेबाजी करताना 63 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या आहेत. त्यात 10 खणखणीत चौकार आणि 3 उत्तुंग षटकार ठोकले आहेत. उन्मुक्त चंदसोबत वेस्ट इंडिजचा फंलदाज नरसिंह देवनारायणने देखील 30 चेंडूत नाबाद 51 धावा खेळी केली आहे. मायनर लीगमध्ये आतापर्यंत 60.80 च्या सरासरीने 304 धावा कुटल्या आहेत. त्यात आतापर्यंत 3 अर्धशतकांचा समावेश आहे. चंदची या लीगमधील सर्वोच्च 90 धावांची नाबाद खेळी आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये उन्मुक्त चंदने दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब या संघाकडून खेळला आहे. तर प्रथम श्रेणींमध्ये 120 सामन्यात दमदार फंलदाजी करत 4,505 धावा केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार

कोरोनाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

“मराठा आरक्षण बैठकीला सरकार तयार होत नसेल तर…’; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

“डिस्को आणि बार ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More