बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | हिवाळा सुरु असून सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. यावेळी सगळीकडे हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झालं आहे. अशातच थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जुगाड केले जात आहेत. अशातच सोशल मीडियावरही थंडीपासून बचाव करण्यासाठी केलेले जुगाड चांगलेच व्हायरल होत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये थंडीपासून वाचण्याचासाठी जुगाड पहायला मिळत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये भल्या थंडीत एक व्यक्ती उघड्यावर नदीत किंवा तलावात अंघोळ करत असलेला दिसत आहे. कडाक्याच्या थंडीतही तो अंघोळ करत आहे. या थंडीपासून वाचण्यासाठी या व्यक्तीनं भलताच जुगाड केल्याचं पहायला मिळत आहे.

एवढ्या थंडीत तो व्यक्ती तलावात डुबकी घेत अंघोळ करत आहे. त्याच्यासमोर काहीतरी पेटवलेलं दिसत आहे. एक डुबकी मारुन तो त्या छोट्या शेकोटीचा आधार घेत आहे. छोट्या शेकोटीला थोडंसं शेकत परत एक डुबकी मारत असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, माझा भारत महान आहे… आशादायक भारत. यासोबतच इतके हुशार लोक फक्त भारतातच का जन्माला येतात?, असंही म्हटलं आहे.

 

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपमध्ये नक्की चाललंय काय?; आता सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम

सेक्स करताना अतिउत्साह नडला; तरूणाला गाठावं लागलं थेट रूग्णालय

Gold-Silver Price: वाचा सोने-चांदीचा आजचा ताजा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More