अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”

Water Crisis | पाणी हा सजीवांसाठी जीव की प्राण आहे. पाण्यामुळे हे जग असून पाण्याचा मुलभूत वापर हा आपली तहान भागवण्यासाठी आपण करतो. मात्र त्यानंतर दैनंदिन आयुष्यामध्ये पाण्याचा वापर हा अनेक कारणांसाठी होतो. पण इतर काही राज्यात देखील पाणी टंचाई (Water Crisis) पाहायला मिळते. अशातच यापार्श्वभूमीवर भाजप नेत्याने पाण्यावरून एक विधान केलं आहे. पाण्याच्या विधानाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा अजित पवार यांनी दुष्काळी भागावर भाष्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याची आजही चर्चा आहे.

अजित पवार यांच्या धरणाच्या विधानाने मोठा गदारोळ झाला होता. त्याचे आजही राज्यात पडसाद उमटताना दिसतात. अशातच आता परराज्यातील एका नेत्याने दुष्काळी भागात पाणी नसल्याने एक वक्तव्य केलं आहे. अजितदादांनंतर भाजपच्या नेत्यानं भाष्य केलं आहे. (Water Crisis)

राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट :

राजस्थान राज्यात तीव्र जलसंकट (Water Crisis) ठाकलं आहे. राजस्थान राज्यातील उष्णतेचा पारा हा 50 अंशाहून पार आहे. यामळे मृत्युचं प्रमाण अधिक झालं आहे. अनेक शहरात पाणी पुरवठा सातत्याने विस्कळीत होताना दिसत आहे. भर उन्हाळ्यात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना कंबरेवर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावं लागलं आहे. यामुळे आता राजस्थानमधील ग्रामीणभागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राजस्थानमध्ये जलसंकट (Water Crisis) ओढावल्याने नागरिकांना दररोज पाण्याच्या संकटाला तोंड द्यावं लागत आहे. याचपार्श्वभूमीर राजस्थानचे मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी पाणी टंचाईवरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी फुक मारुन पाणी घेऊन येऊ, वा हनुमानसारखं लागलीच पाणी आणू, असं शक्य नाही’, असं वक्तव्य केलं आहे.

पाण्याची नासाडी करेल त्याच्यावर कारवाई

जेवढं पाणी आहे तितका पुरवठा करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. लोकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं आहे. तसेच जो पाण्याची नासाडी करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे.

राजस्थानमधील काही भागात पाणी टंचाई आहे. त्याभागत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यावर भर दिला आहे. तसेच जर कोणी पाण्याची नासाडी करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं कन्हैया लाल चौधरी यांनी म्हटलं आहे.

News Title – Water Crisis In Rajasthan Minister Kanhaiya Lal Chaudhary

महत्त्वाच्या बातम्या

पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला दिला सर्वात मोठा धक्का

‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..