भर पावसाळ्यात ‘या’ शहरात पाणीटंचाईचे चटके; नागरिकांनो पाणी जपून वापरा!

Water Cut | राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, कुठे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. पावसाने दमदार हजेरी लावल्याने बऱ्याच भागातील धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नाशिकमध्ये भर पावसाळ्यात पाणी कपात (Water Cut) केली जाणार आहे.

नाशिकमध्ये या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा (Water Cut) बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना दोन दिवस पाण्याचे नियोजन करून वापरावे लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून मुकणे धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या 700 मि.मी. मुख्य गुरुत्ववाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची व व्हॉल्व्ह दुरुस्तीचे कामे केली जाणार आहे.

नाशिक शहरात शनिवारी पाणीबाणी

यामुळे मनपाचे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, व्हॉल्व्ह बदलणे आदी (Water Cut) देखभाल दुरुस्तीची कामे तसेच गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील उर्वरित कामे करणे गरजेचे असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

नाशिकमध्ये शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची नोंद घेत मनपास सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलंय.

पावसाने दांडी मारल्यास पाणी समस्या वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक (Water Cut) जिल्ह्याच्या धरणातील पाण्यासाठ्यात 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात जर पावसाने अजून दांडी मारली तर पाण्याची समस्या अजूनच वाढू शकते. त्यामुळे पाणी जपून वापरा, असं आवाहन देखील मनपा प्रश्नासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने येथे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे फळबागांना आणि भाजीपाल्याला रोगराईचा फटका बसत आहे. पिकांचे नुकसान झाल्याने परिणामी भाजीपाला देखील महाग होत आहे.

News Title –  Water Cut in Nashik

महत्त्वाच्या बातम्या-

“मी बॉलिवुड अभिनेत्रीशी..”; क्रिकेटपटू कुलदीप यादवने लग्नाबाबत अखेर सोडलं मौन

शरद पवारांचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराचा राजीनामा, लवकरच हाती घेणार तुतारी?

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होण्याची संभावना!

पुण्यात ड्रोनच्या घिरट्या थांबायचं नाव घेईनात; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण