बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू

पुणे | रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पुण्यातील निर्बंधही काही दिवसांपुर्वी उठवण्यात आले. यानंतर पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र पुण्यात सोमवारपासून पुन्हा तेच निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचं कळतंय.

पुण्यातील रुग्णसंख्या घसरत असतानाच पुण्यात डेल्टा प्लस व्हेरिंएंटचा धोका मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. यावेळी शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असं सांगण्यात आलं आहे.

बैठकीदरम्यान लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. हे थांबलं पाहिजे. तसेच लहान मुलांना धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असल्याचं वळसे- पाटील म्हणाले आहेत. पुण्यात पुन्हा सोमवारपासून मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.

पुण्यातील नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार आहेत. तसेच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाणार. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.

थोडक्यात बातम्या-

शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल- बच्चू कडू

“डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली”

“अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार”

“हातात होतं तेव्हा केलं नाही अन् आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यात करतो”

इंजिनीयरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा

धक्कादायक! मुंबईत 2053 लोकांना बनावट लस; उच्च न्यायालयाने व्यक्त केली ही काळजी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More