बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

नवी दिल्ली | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. भारत आणि न्युझीलंडमध्ये हा सामना खेळवला जात आहे. या फायनल सामन्याचा पहिला दिवस पाण्याने वाया गेला होता. त्यानंतर 4 दिवस पुर्ण खेळ होईल, अशी अपेक्षा होती. पण पावसाने पुन्हा खोळंबा करत सामन्याची चिंता वाढवली आहे.

चौथा दिवस सोमवारी संततधार पाऊस पडल्यामुळे एकही चेंडू न खेळता दिवस रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी देखील पावसाचा खेळ सुरु असल्यानं सामन्याच्या सुरुवातीला विलंब झाला, शिवाय खराब प्रकाशामुळे देखील सामना वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशी 76.3 षटके  खेळवण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी देखील फक्त 64.4 षटके टाकण्यात आली होती. त्यामुळे आजचा चौथा दिवस असला तरी फक्त 141 षटकांचा खेळ झाला आहे.

सामन्याच्या पाचव्या दिवशी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. ज्यामुळे पहिल्या दोन अवधीच्या तुलनेत खेळाची शक्यता कमी आहे. 22 जून रोजी साऊथॅम्प्टनमधील हवामान पुन्हा ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्याचा पाचवा दिवस वाया जाण्याची शक्यता आहे. मैदान स्टाफच्या मेहनतीने सामना सुरू झाला तरी सामना कमी षटकांचाच खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. 23 जूनला सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असल्यानं 6 व्या दिवशी देखील सामना रंगणार आहे.

दरम्यान, अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा होती, परंतु साऊथॅम्प्टनच्या हवामानाने अंतिम सामन्याची माती केली. पावसाने क्रिकेट रसिकांच्या आनंदावर विरजन पडलं. अशातच इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केवीन पिटरसनने इंग्लंडमध्ये एवढी महत्त्वाची मॅच खेळवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे, असं मत मांडलं आहे. तर अनेक इतर खेळाडू देखील आयसीसीवर टीका करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

“शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको”

मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल येणार जीएसटीच्या कक्षेत?; न्यायालयाने सरकारला दिला ‘हा’ आदेश

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More