पाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण!

पुणे | पाणी येत नसल्याची तक्रार केली म्हणून भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून एका कुंटुंबास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यकर्त्यांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घरी पाणी येत नसल्यामुळे संतोष दोडके यांनी पाणी येत नसल्याची तोंडी तक्रार नगरसेवक कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले होते.

दरम्यान, रात्री तुषार कामठे यांच्या ड्रायव्हरनी दोडके यांना घरातून खाली बोलावून घेतले आणि दरवेळी पाणी येत नाही, अशी तक्रार का करता असं विचारत लाथा बुक्क्यांंनी मारहाण करण्यास सुरूवात केली. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिस तक्रार!

-‘मी टू’ विकृत मनाच्या लोकांनी सुरू केलेली मोहीम; भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

-महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर टाळं ठोकू; पुजाऱ्याचा इशारा

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या