बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून चक्क धरणातून सोडले पाणी, अधिकाऱ्यांचा प्रताप उघड

बंगळुरू | कर्नाटकच्या राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क धरणातून पाणी सोडलं आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत जोग फॉल्स पाहण्यासाठी गेले होते. त्यांना धबधबा सुंदर दिसावा यासाठी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. हे पाणी सो़डण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमधील शरावती नदीवर लिंगनमक्की हे धरण आहे. लिंगनमक्की या धरणाची क्षमता 151 टीएमसी इतकी आहे. या धरणापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेला जोग फॉल्स धबधबा पाहण्यासाठी राज्यपाल येणार होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चक्क धरणातून 500 क्युसेक पाणी सोडलं. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देण्याकरिता अधिकाऱ्यांनी प्रताप केला.

कर्नाटक राज्यातील केलाडी शिवप्पा नायक आणि फलोत्पादन विज्ञान विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी राज्यपाल थावरचंद गहलोत शिवमोग्गा येथे गेले होते. राज्यपालांना धबधबा पुर्ण क्षमतेनं पाहता यावा यासाठी कोणतीही पुर्वपरवानगी न देता आणि नदीकाठच्या लोकांना कोणतीही पुर्वसुचना न देता नदीकाठच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे.

दरम्यान, राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी धबधब्याच्या पर्यटनाचा व्हिडीओ ट्विटदेखील केला आहे. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात असलेल्या भारतातील सर्वांत सुंदर जोग फॉल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अतुल्य भारताच्या प्राकृतिक सुंदरतेचे हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून खूप समृद्ध आहे. इथे एकदा जोग फॉल धबधब्याला भेट देऊन आनंदयात्रा जरूर करावी, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चढउतार सुरूच, वाचा आकडेवारी

ओमिक्राॅन कोरोना व्हेरिएंटबाबत केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी

भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदूंशिवाय भारत नाही – सरसंघचालक मोहन भागवत

परळीनंतर आता ‘या’ देवस्थानालाही बॉम्बने उडविण्याची धमकी

भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More