बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“व्वा रे बिट्या, तुला कुणी सांगितलं?; महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल”

अहमदनगर |  भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीची टांगती तलवार आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. ते पारनेर येथे बोलत होते.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं?, ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, असं सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे, ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचं राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही, मात्र भाजपकडून अनेक प्रकारे असं राजकारण सुरू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या-

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

“महाराष्ट्राची जनता अनाथ झाली की काय, त्यांचं कोणीच वाली नाही का?”

‘मीच तो सर्वज्ञ’ फडणवीसांच्या अशा स्वभावामुळे राज्यावर संकट आलं- रूपाली चाकणकर

‘दोन जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी आम्हाला…’; मनसे-भाजप युतीबाबत नानांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More