बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

गडचिरोली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी कोणाच्या कलाकृतीचा तर कधी हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल होतात. एवढंच नाही तर कधी-कधी प्राण्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच गडचिरोली येथील एका हत्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक हत्ती समोरच्या हापशाजवळ उभा असल्याचं दिसतोय. त्याला तहान लागल्यामुळे तो हापशामधून थेट पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आपल्या सोंडीने हापसा खाली-वर करतोय. तसेच हापशाला कसलीही इजा होणार नाही, याचीसुद्धा तो काळजी घेतोय.

हापशामधून पाणी काढत असताना हा हत्ती अतिशय समजदारीने वागतोय. तहान लागलेली असली तर तो वेड्यासारखं न करता हापशामधून पाणी बाहेर येण्याची वाटत पाहतो आहे. व्हिडीओच्या शेवटी हापशामधून पाणी आल्यानंतर तो खाली जमा झालेले पाणी आपल्या सोंडीने पितो आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत 29 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. लोक या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

लहान मुलांना कोरोना झालाय?; केंद्र सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना नक्की वाचा…!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More