महिला विश्वचषकात सांगलीच्या पोरीचं शतक, विंडीजचा पराभव

लंडन | महिला विश्नचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघानं वेस्ट इंडिजला पराभूत करण्याची किमया साधलीय.

वेस्ट इंडिजनं दिलेलं १८३ धावांचं आव्हान भारतानं ४२.३ षटकात ३ जणींच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

खरंतर वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर पूनम राऊत(०) आणि दीप्ती शर्मा (६) लवकर माघारी परतल्या.

मात्र मिताली राज आणि मोना शर्माला हाताशी धरुन सांगलीकर स्मृती मंधानाने शतक तर झळकावलंच सोबत भारताला विजयही मिळवून दिला. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या