बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी उद्या महाराष्ट्रात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून कोल्हापूरातील शाहू समाधी स्थळापासून या मोर्चास सुरुवात होणार आहे. आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे आज आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, उद्याचे आंदोलन हे एक मूक आंदोलन आहे. बहुतांश लोकांना असे वाटते की हा एक मोर्चा आहे. पण मोर्चा काढण्याची ही वेळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण लोकांना वेठीस का धरायचे? समाजाने आपली भूमिका मांडली आहे. आता लोकप्रतिनिधींनी देखील बोलले पाहिजे.

उद्याच्या आंदोलनासाठी सर्वच खासदार, आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांना आपण सन्मानपूर्वक वागणूक द्यायची आहे. उद्या कोणीही बोलायचे नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे आहे. लोकप्रतिनिधींना त्यांचे मन मोकळे करु द्या. हवे तेवढा वेळ त्यांना बोलूद्यात, असंही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला उद्या कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. कोरोना नियमांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंग ठेवून, अंतर ठेवून शांतपणे आंदोलन करायचे आहे. उद्या कोणत्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

ह्दयद्रावक! ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू

कोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद!

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस

‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More