Top News राजकारण

“आमचं आणि राज्यपालांचं एकमेकांवर प्रेम; 12 जणांची यादी ते नाही नाकारणार”

मुंबई | महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलीये. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. शिवाय राज्यपालांवर आमचं प्रेम असून त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केलाय.

संजय राऊत पुढे म्हणाले, “या प्रेमातून याच्या पुढे सर्व कारभार सुरळीत पार पडेल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करत असतो. त्यामुळे राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत.”

शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव आहे. त्यांच्यासारख्या स्पष्टवक्ताजर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल, असंही राऊत यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या 

तज्ज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?; आशिष शेलारांचा टोला

“…तर मी कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं असतं”

नवा रेकॉर्ड तयार करावा, बिहारच्या जनतेला पंतप्रधान मोदींचं आवाहन

…हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे; शिवसेनेची भाजपवर टीका

“मंत्रीपदासाठी भाजपमध्ये गेलेल्या मंडळींना शपथेची स्वप्न पडतायत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या