मुंबई | CAA वरुन राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर सर्व देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू युवराज सिंहने आपली भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत जे काही चाललं आहे ते मनाला भिडणारं आहे. सर्वांना कृपया शांतता व सुसंवाद राखण्यासाठी विनंती करा. परिस्थितीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना मदत करा, असं आवाहन युवराज सिंहने दिल्लीच्या नागरिकांना केलं आहे.
आपण सर्व माणूस आहोत. आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येकाना प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, असंही युवराजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात असल्याचं, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
What’s going on in Delhi is heart breaking, requesting everyone to please maintain peace and harmony. Hoping the authorities will take corrective measures to curb the situations. End of the day we are all humans, we need to love and respect each other 🙏 #DelhiBurning
— yuvraj singh (@YUVSTRONG12) February 26, 2020
ट्रेडिंग बातम्या-
बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर
भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली शांत करण्याची जबाबदारी मोदी-शहांनी सोपवली ‘या’ व्यक्तीवर
सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला
तुकाराम मुंडेंची धडक कारवाई; कुख्यात गुंडाच्या आलिशान बंगल्यावर हातोडा
Comments are closed.