बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

मुंबई | आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म दिवस असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  या निमित्ताने मनसे नेत्यांनी अनेक समाज कल्याणाकरीता उपक्रम हाती घेतले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते लसीकरण उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं.

त्यानंतर, बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पक्षाची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. येत्या महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महानगरपालिका आणि इतर निवडणुकांची प्रचंड तयारी झाली आहे.

तसेच महाराष्ट्रातील लोकांच्या समस्यांचं राज ठाकरे सतत चिंतन, मनन करत असतात. त्यांनी पक्ष स्थापन केला त्यावेळी राज ठाकरे यांनी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण केलं. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे ते थोडे थांबले आहेत. ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर ते बाहेर पडणार असल्याचंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारात, पाहा आकडेवारी

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तलावात 500च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं असं काही की…

फेसबुक लाईव्ह करत रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More