बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्या जीवाला धोका, जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत”

मुंबई |  आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर अनेकांकडून आरोप-प्रत्यारोप होतं आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यावरून आता समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मीडियासमोर येत धमक्या येत असल्याचे आरोप केले आहेत.

आमच्या जीवाला धोका आहे. जाळून टाकू, मारून टाकू, लटकून टाकू, अशा आम्हाला धमक्या येत आहेत, असं क्रांती रेडकरने सांगितलं आहे. यावेळी क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्या कुटूंबाला धमकी दिली जात आहे.आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यावर ते जाहीर करू, असा इशारा क्रांती रेडकर यांनी दिला आहे.

आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे आम्ही सरकारचे आभारी आहोत. वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळचं नवाब मलिकांना उत्तर देईल, असंही क्रांती रेडेकर यांनी म्हटलं आहे. अनेक बनावट कागदपत्र तयार केली जातील. समीर वानखेडे यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात कठीण गोष्ट आहे. हे लोक सिद्धचं करू शकणार नाही कारण हे सर्व खोटं आहे, असंही क्रांती रेडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे आम्हाला निश्चित त्रास होत आहे. मला मराठी असल्याचा अभिमान आहे. माझ्याचं राज्यात मला घाबरवलं जात आहे. इतर राज्यातून आणि आपल्या राज्यातून काही समर्थनाचे फोन येत आहेत, असं क्रांती रेडेकर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More