बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता”, अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

जालना | 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना (ShivSena) आणि भाजपमध्ये (BJP) वाद झाल्याने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झालं. तीनही पक्षातील नेत्यांच्या सरकार संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं वक्तव्य केलं आहे.

यावेळी अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच स्थानिक पातळीवर आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. परंतु, राज्य व्यवस्थित चालले पाहिजे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

यावेळी अशोक चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपवर टीका केली आहे. भाजपला देशातील ,राज्यातील आरक्षण संपवून टाकायचे आहे. याकारणामुळेच भाजप अहसहकाराची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) बाबतीतही केंद्र सरकारने (Central Government) योग्य भूमिका घेतली नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने 50 टक्क्यांची अट न काढता राज्यांना अधिकार दिले. त्यांनी कायद्यात बदल केले नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात संसदेत कायदा केला असता तर विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला मराठा समाजाला, ओबीसींना आरक्षण (OBC reservation) द्यावयाचे नाही. केंद्र सरकार जेवढ लवकरात लवकर जाईल तेवढा लवकर बारा बलुतेदारांना मोकळा श्वास मिळेल, असं अशोक चव्हाण म्हणाले आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण…”

लिटल मास्टर म्हणतात, “नेमकं काय झालंय हे फक्त ‘तो’ व्यक्ती खरं सांगू शकतो”

“तो दिवस मी विसरू शकत नाही, मी शाळेत होतो तेव्हा…”, भर कार्यक्रमात राहुल गांधी भावूक

‘मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे होणार’, केंद्र सरकारच्या हालचालींना वेग

Mr.360 वादाच्या भोवऱ्यात! ‘या’ प्रकरणात आढळला दोषी, कारवाईची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More