‘…म्हणून आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे’; संजय राऊतांनी सांगितलं कारण
मुंबई | राज्यात राज्यभा निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. राजकीय पक्षांनी आमदारांची जमवाजमव करण्यास सुरूवात केलेली आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच अन्य पक्षांचेही आमदार हॉटेलमध्ये आणण्यात आले आहेत. त्यातच आता संजय राऊतांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असतं. त्यासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लहान पक्षांच्या काही मागण्या असतात, अनेकदा त्या मागण्या मान्य होत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्व मित्रपक्ष आजही आमच्याबरोबर आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ही एकमेकांची शक्ती दाखविण्याची पहिली संधी आहे. आम्ही हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतलं आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी आमचा संवाद सुरू आहे. आमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही. आम्ही रिलॅक्स आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, निवडणूकीमध्ये सर्वच पत्ते उघडे करायचे नसतात. 10 जूनला मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे दोनही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकतील. तसेच महाविकास आघाडीच्या चारही जागा जिंकतील, असं संजय राऊत म्हणाले. मंगळवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर
‘चिरीट तोमय्या आमदार शिवसेनेला मतदान करतील, पण…’; दिपाली सय्यद यांनी सोमय्यांना डिवचलं
मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे इस्लामिक देश संतप्त, कुवैतचा भारताला झटका
मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ‘ही’ दोन नावं ठरली
“…असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”
Comments are closed.