बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्राकडून मिळालेल्या सदोष व्हेंटिलेटरबाबत आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही”

औरंगाबाद | कोरोना काळात औरंगाबादच्या शासकीय आणि वैद्यकीय रुग्णालयाला पीएम केअर फंडातून पुरवलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. केंद्र सरकार पुरवठादारावर काय कारवाई करणार असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला होता. त्यावर केंद्र सरकारनं आज उत्तर दिलं. औरंगाबादच्या घाटीला केंद्राकडून मिळालेल्या सदोष व्हेंटिलेटरबाबत आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही, हे प्रकरण सामंजस्याने सोडवायला हवं, असं उत्तर केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे. कोरोनासंदर्भातील विविध याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

सदोष व्हेंटिलेटर्सच्या बाबतीत दिल्लीहून 2 डॉक्टरांचं विशेष पथक उद्या औरंगाबादला भेट देणार आहे, अशी माहिती अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात दिली आहे. तर व्हेंटिलेटर्स पुरवणाऱ्या कंपनीचे 8 तंत्रज्ञ याआधीच औरंगाबादमध्ये पोहोचलेले आहेत. ते सर्व उपकरणांची चाचणी करत आहेत, जर जुजबी दुरुस्तीनंतरही ते व्हेंटिलेटर्स सुरु झाले नाहीत तर कंपनी ते बदलून देईल. कंपनीनं 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, असं एएसजी अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात सांगितलं आहे.

राज्य सरकारनं याबाबत 29 मे ला घेतलेल्या विशेष बैठकीचा अहवाल न्यायालयात सादर केला. ‘ज्योती सीएनसी’ या कंपनीमार्फत केंद्र सरकारनं पाठवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये वारंवार दुरुस्तीनंतरही बिघाडाच्या तक्रारी असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे, सरकारी वकिलांनी याची माहिती न्यायालयात दिली आहे.

दरम्यान, काळ्या बुरशीच्या आजाराबाबतही दाखल याचिकेवरही उच्च न्यायालयात सुनावणी झाली. काळ्या बुरशीचा रोग भयानकरित्या राज्यात पसरत आहे, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. एकट्या अहमदनगरमध्ये गेल्या 3 दिवसांत 9,928 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

लहानशा पक्ष्याला वाचवायला गेला शार्कजवळ अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हाली बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

कोरोना रुग्णांसाठी देशभरातील हॉस्पिटल्सला 1000 बेड्स देणार- युवराज सिंह

कोरोना काळात ‘मस्ती की पाठशाला’; ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर

‘मी लग्न करणार नाही कारण माझा…’; तुषार कपूरने सांगितलं खरं कारण!

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More