काहीही झालं तरी एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही- प्रकाश आंबेडकर

परभणी | काँग्रेससोबत आली काय अन् नाही काय आम्ही एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते परभणीत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. विधानसभेच्या 50 जागा या वर्गाला दिल्या जाणार आहेत. या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी एका राष्ट्रीय पक्षाकडून हीन पातळीवर टीका केली जात आहे, असं त्यांनी म्हटलं. 

एल्गार परिषदेनंतर मराठा आणि ओबीसी समाजात वाढलेल्या दरीला भाजपाकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे. 

दरम्यान, काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत बहुजन वंचित आघाडीची केवळ एकच बैठक झाली आहे. मात्र त्यांनी एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही; शोभा डे यांचे मोदींवर टीकास्त्र

-…तर सरपंचही खासदारापेक्षा वरचढ ठरेल- संजय राऊत

-लोकसभेसाठी भाजप ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मैदानात उतरवणार?

-#MeToo मोहिमेनंतर आता #MenToo; पुरुषही अत्याचाराला वाचा फोडणार

-राष्ट्रवादीच्या बैठकीत चक्क बसण्याच्या जागेवरून राडा; पहा नक्की काय घडलं…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या