बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्हाला कोणाच्याही भांडणात रस नाही, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?’; संभाजीराजे कडाडले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे भोसले महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांची भेट घेतली. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आरक्षणाबाबतची आपली भूमिका मांडली. मुंंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही. मागे न्यायालयाने आरक्षण रद्द केलं तेव्हा सर्वजण आक्रमक झाले होेते मात्र मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ असल्याचं संभाजी राजे भोसले म्हणाले.

आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. मी सांगू इच्छितो 2007 सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे, संभाजी राजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,आम्हालाही आक्रमक होता येतं. पण ही वेळ आहे का आक्रमक व्हायची? किती वर्ष आपण या वर्गाचा वापर करायचा? मराठा समाजातला 30 टक्के वर्ग कधीच रस्त्यावर येत नाही. फक्त 70 टक्के गरीब वर्ग रस्त्यावर येत असतो. पण यापुढे आम्ही कुणीच हे चालून देणार नसल्याचं संभाजी राजे भोसलेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

बोलण्यास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं केले वार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

विवाहितेनं ‘या’ कारणामुळं सॅनिटायझर पिऊन केली आत्महत्या; नवऱ्याने तिच्या मृत्यूनंतरही केलं लाजीरवाणं कृत्य

‘खाकी’तली माणुसकी! रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या महिलेची आणि तिच्या बाळाची महिला काॅन्सटेबलन केली मदत

धक्कादायक! सेक्स करण्यास नकार दिल्यानं पतीने केली पत्नीसह आपल्या तीन मुलांची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More