बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं कारण…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर त्यांनी भाजपसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले. त्यांच्या युतीनंतर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळणार म्हणून भाजपचे लोक नाचत होते. परंतु सरळ असेल ते राजकारण कसले? दिल्लीश्र्वरांनी राजकीय डाव आखले आणि 40 आमदारांचा गट घेऊन आलेल्या नेत्याच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

या धक्क्यामुळे राजकारणी आणि सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावल्या. लोक विचारमग्न झाले आणि शंकांना तोंड फुटले. खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांना सल्लाच दिला. पवार म्हणाले, 105 आमदारांचा नेता उपमुख्यमंत्री होतो आणि तुम्हाला मुख्यमंत्री केले. यात, ‘दाल मे कुछ काला है’. त्यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी खुलासा केला आहे.

राजकीय भवितव्य पनाला लावून एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखविल्याने आणि भाजप सत्तापिपासू नाही म्हणून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले गेले. शिंदे हेच शिवसेना भाजप युतीचे नेते आहेत. अडीच वर्षांनी आम्ही बहुमत मिळवून सत्तेत येणार आहोत आणि जनतेची कामे करणार आहोत, असे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप राज्य कार्यकारिणीच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच भाजपने सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सत्ता परिवर्तन केले. मला सत्तेचा मोह नाही. त्यामुळे मी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. परंतु विरोधकांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद नाही मिळाले म्हणून त्यांचा चेहरा रडकूळा झाला होता असे म्हंटले होते.

थोडक्यात बातम्या –

सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More