Top News देश

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली | भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. देशात लसीकरण केव्हा सुरू होणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं आहे. पत्रकर परिषदेत ते बोलत होते.

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, असं राजेश भूषण म्हणाले.

दरम्यान, डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ

शिवसेना ही नाटक कंपनी आहे- देवेंद्र फडणवीस

‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकेल ; भाजप खासदाराला विश्वास

‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या