महाराष्ट्र मुंबई

“झट की फट निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला?”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी ‘झटका’ निर्णय घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडतात. नोटाबंदी करताना लोकांना एका मिनिटाचाही वेळ दिला गेला नव्हता. मग इतक्या गंभीर महामारीप्रसंगी वेळ का काढला गेला? रेल्वे आधीच का बंद केली गेली नाही?,’ असा प्रश्न शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.

गर्दीचा संसर्गजन्य अड्डा हा रेल्वेच आहे. मुंबई, पुण्याच्या रेल्वे फलाटांवर सगळ्यात जास्त गर्दी असते. मुंबईच्या रेल्वेवर सगळ्यात आधी बंदी आणायला हवी होती. पण रेल्वे प्रशासन त्यास तयार नव्हते. येथेही जी चूक इटली, जर्मनीत झाली तीच चूक आपण केली, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोनाबाबत महाराष्ट्र आता खऱ्या अर्थाने ‘डेंजर झोन’मध्ये आहे. आतापर्यंत बेरजेच्या संख्येने वाढणारी कोरोनाबाधित व संशयितांची संख्या पुढे गुणाकाराच्या पटीत वाढू शकते. भारताचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल व स्वतःचे किमती आयुष्य पणाला लावायचे नसेल तर सगळ्यांनी ‘घरी’च थांबायला हवं, असं आवाहनही अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

दरम्यान, 1986 च्या प्लेग साथीत पुण्यात टिळक, आगरकरांपासून सगळ्याच मातब्बरांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केले व शहराबाहेरच्या तंबूत जाऊन राहिले होते. आता शहराबाहेर नाही, तर घरातच राहायचे आहे, असं म्हणत  टिळकांची आणि आगरकरांची आठवण करून देत नागरिकांना सतर्क राहण्यचं आवाहन केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्र्यांनी फक्त भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही”

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला; रुग्णसंख्या 89 वर

महत्वाच्या बातम्या-

लगेच सेलिब्रेशन सुरु करु नका; नरेंद्र मोदींनी जनतेला खडसावलं

‘हे अपेक्षित नाही…’, रस्त्यावर उतरुन घंटानाद करणाऱ्यांवर अजित पवार संतापले

कोरोना नियंत्रणासाठी न्यायालयांचा पुढाकार; न्यायाधीशांनी दिला महिन्याचा पगार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या