जयपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा माजी पंतप्रधान पंडीत नेहरू आणि गांधी परिवारावार शाब्दिक हल्ला केला आहे. त्यातच आता राजस्थान विधानसभेत एका आमदाराने गांधी आणि नेहरू घराण्याबाबत वक्तव्य केलं आहे. एका आमदाराचं विधानसभेतील वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
आम्ही गांधी आणि नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि ही गुलामगिरी आम्हाला नेहमीच करायची आहे, असं संयम लोढा यांनी म्हटलं आहे. हरिदेव जोशी पत्रकारिता विश्वविद्यालय दुरूस्ती विधेयकावर बोलताना संजय लोढा यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे.
भाजप नेते आमच्यावर गांधी नेहरू परिवाराचे गुलाम असल्याचा आरोप करतात. आम्ही गांधी परिवाराच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हटलं जातं. यामुळे मला सांगायचं आहे की, आम्ही गांधी घराण्याचे गुलाम आहोत आणि कायम राहणार आहोत, असं संयम लोढा यांनी म्हटलं आहे. गांधी आणि नेहरू परिवार नसता तर आज भारत देश स्वतंत्र्य झाला नसता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोवर आम्ही गांधी आणि नेहरू घराण्याचे गुलाम बनून राहू. गांधी घराणे नसते तर 1947 मध्ये देश स्वतंत्र्य झाला नसता. लोढा यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी भरपूर समाचार घेतला. लोढा यांचं वक्तव्य विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकावं, अन्यथा संपुर्ण राजस्थान त्यांना गुलाम म्हणेल, असं असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे.
थोडक्यात बातम्या-
तरूणांसाठी गुड न्यूज; परिक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी
रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा!
रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत
“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवून दाखवतो”
“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना आता…”
Comments are closed.