बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात लॉकडाउन केल्यामुळे नोकरी करणारे सर्वच जण घरी बसून काम करू लागले. त्यावेळी लॅपटॉपचे महत्त्व सगळ्यांना समजून आले. आजकल प्रत्येक जण संगणक किंवा लॅपटॉपचा वापर करताना दिसत आहेत. कार्यालयीन काम असो किंवा ऑनलाईन व्हिडीओ खेळ खेळण्यासाठी बहुतेक प्रत्येक तरूणांकडे लॅपटॉप हा आहेच. परंतु बऱ्याच वेळा आपण संगणक जास्त वापरल्याने हॅंग होतो. त्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

जर तुमच्या लॅपटॉपचा वेग कमी झाला असेल तर सर्वप्रथम बिनकामाचे डिव्हाइसवरून सॉफ्टेअर डिलीट करा. असं केल्याने तुमच्या लॅपटॉपला वेग देखील येईल आणि हॅंग देखील होणार नाही. त्यासाठी सॉफ्टवेअर हटवण्यासाठी संगणक आणि लॅपटॉपच्या पॅनेलवर जाऊन प्रोग्राम अनइन्स्टॉलच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येथून जे तुमच्या काहीच कामाचे नाहीत ते सॉफ्टवेअर डिलीट करा.

लॅपटॉप किंवा संगणकची डिस्क क्लीन अॅप करण्यासाठी सर्वप्रथम संगणक आणि लॅपटॉप उघडा आणि माझे संगणक विभागात जाऊन डिस्क ड्राइव्ह वर क्लिक करा. याठिकाणी प्रोपर्टी वर टॅप करा. तुम्हाला तळाशी डिस्क क्लीन अॅपचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. असं जर केल्याने डिस्कवरील फाईल्स आणि वेब डेटा डिलीट होईल आणि तुमची प्रणाली वेगाने काम करण्यास सुरूवात करेल.

दरम्यान, लॅपटॉपचा वेग वाढवण्यासाठी तुम्ही सिस्टमला चालना देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोर्सेर आणि किंग्स्टन सारख्या कंपन्यांकडून रॅम खरेदी करू शकता. हा एक वेग वाढवण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.

थोडक्यात बातम्या- 

दबाव आला तरी सहन करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राहुलचा धमाका, रोहितची तुफान खेळी; ऑस्ट्रेलियावर भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय

अन् नगरसेवकांच्या वादावरून नाना पटोले आणि अशोक चव्हाणांनी लावला डोक्याला हात

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म

परमबीर सिंह बेपत्ता! उच्च न्यायालयात राज्य सरकारची धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More