Top News

मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्हीच निकाली काढणार- मुख्यमंत्री

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्हीच निकाली काढणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राजाराम महाराजांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. 

कायमस्वरूपी आरक्षण आम्हीच देणार. आयोगाच्या अध्यक्षांनी आपलं काम सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा आमच्या सरकारनं केला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, असं काही लोक म्हणतात, मात्र तसं आरक्षण दिल्यास ते एक दिवसही टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील. राज्य सरकार नक्कीच या बाबी पुर्ण करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आंदोलनाचे नेतृत्व उदयनराजेंना सोबत घेऊनच करणार- संभाजीराजे

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या