बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो, इथं दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही”

मुंबई | राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईतील मुस्लीम समाजातील व्यक्तींशी संवाद साधला. त्यावेळी ग्लोबल स्टेटर्जिक पॉलिसी या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या विषयावर मोहन भागवत यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यावेशी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो. इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही. राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असं मत यावेळी मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हिंदू समाजावर बोलताना, भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम यांचे पूर्वज एकच आहेत. आमच्यासाठी हिंदू शब्द हा मातृभूमी, गौरवशाली परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे, असं देखील मोहन भागवत म्हणाले.

आपल्याला एकट्या मुस्लीम वर्चस्वाचा नव्हे तर देशाच्या वर्चस्वाचा विचार करावा लागेल. देशात जर प्रगती करायची असेल तर सर्वांना सोबत जावं लागेल. त्यामुळे भारतातील सगळ्या नागरिकांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असं आवाहनही भागवत यांनी केलं आहे.

दरम्यान, आपल्याला कट्टरपंथी लोकांचा विरोध करण्यासाठी आताच जागृत व्हावं लागेल, या जागृतीसाठी जितका वेळ लागेल तितकाच समाजाचं नुकसान होईल, असं भागवत यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

कालच्या आकडेवाढीनंतर आजची मुंबईची कोरोना आकडेवारी; वाचा एका क्लिकवर

विराटसेनेने रचला इतिहास! तब्बल 50 वर्षांनंतर केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी

“बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है”

जसप्रित बुमराहचं ‘शतक’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

“बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला, मुंबई महापालिकेवरही भगवा फडकणारच”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More