Loading...

“राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार”

मुंबई |  महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती लक्षात घेता केंद्राकडे 6800 कोटी रूपयांची मागणी करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच जेवढी मदत मागितली तेवढी मदत आपण उपलब्ध करून दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्राथमिक माहितीनुसार आलेला अहवाल आपण केंद्राकडे पाठवत आहोत. याचे 2 भाग केले आहेत. एक कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तर दुसरा सातारा, कोल्हापूर आणि सांगली. या दोन्ही भागासाठी आपण केंद्राकडे मदत मागत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Loading...

कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रूपये तर सातारा, कोल्हापूर आणि सांगलीसाठी आपण 4700 कोटी रूपयांची मागणी आपण केंद्राकडे करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूरग्रस्तांचं पूनर्वसन केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

-मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एका महिन्याचा पगार

-“प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला 1 हात कधीही महत्वाचा”

Loading...

-“अन् त्या महत्वाच्या क्षणी काश्मिर भारताचा भाग नसेल”

-“अमित शहांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली, पण ‘सासुरवाडी’ची चौकशी करणं अपेक्षित होतं”

Loading...