बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यास आपली संमती नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसमधील अंतरात सातत्यानं बदल करत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. देशात कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मात्र आता दोन डोसमधील अंतर वाढवण्यास केंद्राच्या समीतील काही डाॅक्टरांनी संमती दिलेली नसल्याचं समोर येत आहे.

कोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर जास्तीत जास्त 12 आठवडे असावे अशी शिफारस केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार उपसमितीने केली होती. मात्र वर्कींग ग्रुपने आणि सरकारने हे अंतर 16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला.

दोन डोसमधील अंतर सोळा आठवड्यांपर्यंत वाढवल्यास त्याचे परिणाम काय होतील आणि पहिल्या डोसची परिणामकारकता किती राहील याबाबत कोणत्याही ट्रायल्स झालेल्या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार उप समितीने दोन डोसमधील अंतर जास्तीत जास्त 12 आठवडे ठेवण्याचा सल्ला दिला होता, असं या समितीतील सदस्य डॉक्टर मोहन गुप्ते यांनी म्हटलं आहे. या समितीतील तीन शास्त्रज्ञांनी दोन डोसमधील अंतर वाढवण्यास आपण संमती दिलेली नाही, असही डॉक्टर गुप्ते यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा दावा अमेरिकेतील वैद्यकीय सल्लागारांनी केलाय. देशात सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक या तीन लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर जवळपास 84 दिवस करण्यात आल होतं.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार

32 वर्षाच्या करिअरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार!

‘एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का?’; चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरलं नाही, उद्याही घाबरणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More