मुंबई | गेल्या आठवड्यापासूून विरोधी पक्षनेते अजित पवार( Ajit Pawar) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किती नुकसान झाले, नुकसान झालेल्या किती पिकांचे पंचनामे झाले, त्यातील किती पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली, याची पहाणी ते दौऱ्यादरम्यान करत आहेत. आज ते नारपूरच्या(Nagpur) परिस्थितीचा आढावा घेऊन यवतमाळला (Yavatmal)मुक्काम करणार आहेत.
अजित पवार यांनी पत्रकांरांशी संवाद साधला, त्यावेळी मी राजकारणासाठी हा दौरा करत नाही, मला कसलंही राजकारण यात करायचं नाही. सरकारने केवळ वरवरच्या घोषणा करू नये. कृती करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, सरकारने पुरात दगावलेल्या काही व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे, पण प्राण्यांची नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही, ती लवकरात लवकर शेतकऱ्यांनी मिळावी,अशी मागणी यावेळी पवारांनी सरकारकडे केली.
मला राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत असताना काय करायचं आणि सत्तेत नसताना काय करायचं हे मला माहित आहे. मी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या नाहीत, स्थानिक पदाधिकारी मला भेटायला आले होते. आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही, आधीच खोदतो, त्यानंतर त्यातील पाणी पितो. सर्वच पक्षाच्या कार्यकरत्यांनी निवडणुकीसाठी तयार रहायला पाहिजे, असंही अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, पवार गडचिरोली(Gadchiroli) दौऱ्यावर असताना, आल्लापली ते सिरोंचा 100 किलोमीटरचा महामार्ग मोठे खड्डे असल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून एसटी महामंडळाच्या( ST Mahamandal) बस या मार्गावर बंद आहेत, त्यामुळे प्रवाशांना 100 किलोमीटरच्या प्रवासाठी 300 रूपये मोजावे लागतात,असं तेथील नागरिकांनी पवारांच्या निदर्षनास आणून दिले आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”
‘अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा’, गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी
RBI च्या गव्हर्नरला महिन्याला मिळतात ‘इतके’ लाख, मानधन वाचून थक्क व्हाल
…तर कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, चुकूनही करू नका दुर्लक्ष
ईडी चौकशीवरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.