बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी स्वबळाचा नारा दिला होता. पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांची युती होणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला स्वप्न पाहू नये, असा सल्ला दिला होता. त्यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना प्रत्त्युतर दिलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल. राज्यात सुरू असलेल्या चर्चा ह्या चर्चाच असून, अशी स्वप्न पडणं हा आजार आहे. असं काही होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. शरद पवार हे वयाने, अनुभवाने मोठे आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता रावसाहेब दानवे यांनी प्रत्त्युतर दिलंय.

अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही. आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू, असा टोला रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. चोराच्या मनात चांदणे आहे. हे सरकार पाच वर्षे कसं चालतंय याचं आम्हाला त्याचं काहीच घेणंदेणं नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. विरोधकांनी संसदेत गोंधळ घालू नये. विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित करावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. चर्चा केली तर काही सकारात्मक गोष्टी बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More