बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | येत्या काही महिन्यांवर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. प्रचारसभांना सुरूवात झाली असून आपल्या पुर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात टीका-आरोप होत आहेत. अशातच तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

भाजपला निरोप द्या, आम्हाला भाजप नको. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नको, असं म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. पूर्व मदिनापूर येथे ममतांनी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांच्या पायाला लागलं असलं तरी त्यांनी हार मानता व्हिलचेअरवरून प्रचाराला सुरूवात केली आहे. याआधी नरेंद्र मोदांनीही ममता बॅनर्जींवर निशाणा साधला होता. पुरुलिया येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

ममता दीदींनी पश्चिम बंगालची वाईट अवस्था करुन ठेवल्याचा आरोपही मोदींनी केला. गुन्हे आहेत, गुन्हेगार आहेत मात्र ते तुरुंगात जात नाहीत. माफिया आहेत, घुसखोरी करणारे आहेत मात्र ते मोकाट फिरत असल्याचं मोदी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, ममता बॅनर्जींनी केलेल्या टीकेवर भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाटं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!

‘कार ॲंड बाईक’चे 2021 चे पुरस्कार जाहीर, पाहा कोणत्या गाड्यांनी मारलीय बाजी

धक्कादायक! कोरोनाबाधित रूग्णाने हॉटेलवर जात दारू पिऊन केलं जेवण अन्…

शाब्बास रे पठ्ठ्या! सुवर्णपदक पटकावलेल्या अविनाशवर धनंजय मुंडेंची कौतुकाची थाप

’40 वर्षापासून भाजपची सेवा करतोय… हे आमच्या कुटुंबाचं चुकलं का?’; पुण्यातील नगरसेवकाचं होर्डिंग चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More