बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हरहर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून देण्याची वेळ”

मुंबई |  आज राज्यात दसरा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपल्या राज्यात राजकीय दसरा सुद्धा साजरा होतो. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतून दसरा मेळावा साजरा करण्याची परंपरा सुरू केला होता. आज ष्णमुखानंद सभागृहात शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला संबोधित करत आहेत.

आपल्या भाषणाला सुरूवात करताच ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. आमचा आवाज दाबणारा जन्माला यायचा आहे, या शब्दात ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. हरहर महादेव म्हणजे काय असतं हे दिल्लीतच्या दख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये आणि आली तर मागे हटणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला भाषणातून फटकारलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा दसरा मेळाव्याला संबोधीत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी विरोधकांना घेरलं आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. स्वत:मध्ये हिंमत असेल तर आव्हान द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त केलेल्या भाषणात सर्व बाजूंनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप, आरएसएस, राष्ट्रीयत्व, या सर्व विषयावर उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली आहेत.

थोडक्यात बातम्या 

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

“सूरज सा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझको कब तक रोकोगे”

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More