बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत”

मुंबई | यंदाचा दसरा मेळावा मुंबई सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या उपस्थित हा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना देखील निशाण्यावर घेतलं.

आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी मी बोलत नाही, कोणी जन्माला आला नाही ठाकरे कुुटुंबावर हल्ला करायची तिथल्या तिथं चिरडून टाकू. मी शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवेन म्हटलो होतो आणि ते वचन मी पूर्ण करणारच, असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला आहे.

हर्षवर्धन पाटील अशी लोकं भाजपची ब्रॅन्ड अॅम्बेसिटर झालं पाहिजे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि अंगावर आलो तर आम्ही कोणाला सोडत नाही. ‘मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत’, असा टोला मोदींना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

आरएसएसचे आणि आमचे विचार एक आहेत. मोहन भागवतांचे विचार त्यांनी म्हटलंय हिंदुत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का? आपण मेळाव्यात विचार मांडतो ते पाळणार नसेल तर दसरा मेळाव्यांची काय गरज, असा सवाल मोहन भागवतांना उद्धव ठाकरेंनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही- उद्धव ठाकरे

“आमचं आजही आव्हान आहे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

“हरहर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून देण्याची वेळ”

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More