बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 ची वाट पाहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”

नवी दिल्ली | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होईल असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. अशात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी मोदी सरकार 2024 आधीच कोसळेल, असं भाकित वर्तवलं आहे.

भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना 2024 ची वाट पाहावी लागणार नाही. कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं ओमप्रकाश चौटाला यांनी म्हटलंय.

भाजप-जजपा सरकारही 2024 पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, असं ओमप्रकाश चौटाला म्हणालेत.

इतर पक्षांमध्ये तिकीट पैशांवर मिळते. मात्र इंडियन नॅशनल लोकदल पक्षामध्ये तिकिांचे वाटप जनता करते. हरियाणामध्ये भय आणि भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. इंडियन नॅशनल लोकदल पुन्हा सत्तेत आल्यास शिक्षण आरोग्य, रोजगार यासाठी सरकारचे धोरण ठरवले जाईल, असंही चौटाला यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर…- चंद्रकांत पाटील

आनंदाची बातमी! देशातील वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अखेर आली आटोक्यात

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर !

“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल”

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More