बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

मुंबई | काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्यावेळी भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, असं पुन्हा बोलून दाखवलं होतं. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी, ईडी, सीबीआयची छापेमारी सुरू आहे. त्यावर रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो. आमचं मात्र तसं काही नाही. तो मुख्यंमंत्र्यांचा आरोप आहे. त्यांना अजूनची आमचं आवाहन आहे की, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा बॅक टू पवेलियन आलं पाहिजे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

भाजपचा जो अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव आहे, त्यावर विचार करण्याची हरकत नाही. त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री रहावं आणि अडीच वर्ष फडणवीसांना मुख्यमंत्री करावं. मुख्यमंत्र्यांनी काल भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी अशी भाषा करणं योग्य नाही. ते मुख्यमंत्रीपदावर बसलेले आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना राहिली तर ते त्यांना नुकसान आहे. आगामी महापालिका निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More