बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो, आम्ही रामदेव बाबांसारखं करत नाही- विजय वडेट्टीवार

औरंगाबाद | महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि रामदेव बाबांवर या मेळाव्यात बोचरी टिका केली आहे.

याेगगुरू रामदेव बाबांकडे जेवढ्या गाई नाहीत. ते त्याच्याहून अधिक पटीने जास्त तूप विकत आहेत. तसेच त्यांच्याकडे जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहूनही अधिक मध गोळा करून ते विकतात.  परंतू आपलं तसं काहीच नाही, आमच्याकडे जेवढं तूप निघतं तेवढंच आम्ही तूप विकतो, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी रामदेव बाबांना टोला लगावला आहे.

भाजप सरकारच्या काळात केंद्र सरकारसाेबत इंपिरिकल डाटासाठी आम्ही पत्र व्यवहार केला होता. तसेच आमचं सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हाही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवली होती. परंतु केंद्राकडून आम्हाला इंपिरिकल डाटा मिळाला नाही. ओबीसी समाजाच्या 40 राजकीय जागा आहेत, त्या आम्ही कुणालाही घेऊ देणार नाहीत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित यावं, असंही आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.

दरम्यान, या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर अनेकांनी रामदेव बाबांबद्दल साेशल मीडियावर भन्नाट कमेंट् केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न, भालाफेकमध्ये सुवर्णपदक!

महापौरांच्या कार्यालयात भूत? गार्डसोबत घडला भयानक प्रकार, महापौरांनीच शेअर केला व्हिडीओ!

वाह रे पठ्या! बजरंगने मिळवलं कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर एकहाती विजय

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More