बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

सिंधुदुर्ग | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षांनी घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर खोचक टीका केली आहे.

स्वतःच्या पक्षातील जिल्हाध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर टीका करत असल्याने पक्षांतर्गत असलेल्या कुरबुरी चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले असून, असा लाचार झालेला नेता आम्हाला नको’, असं रतन कदम यांनी रामदास आठवले यांना उद्देशून म्हटलं आहे.

जातीयवादी भाजपबरोबर युती केल्यापासूनच आंबेडकरी जनता आठवले यांच्या विरोधात गेली असल्याचंही कदम यांनी यावेळी बोलून दाखवलं. त्याबरोबरच मंत्रिपदासाठी लाचार झालेला नाही, तर पूर्वीचा पॅंथर वाघ असलेला रामदास आठवले नेता म्हणून आम्हाला हवा आहे, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती करून निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्ष त्यांच्यावर टीका करत असल्याने रामदास आठवले यावर नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More