बीड | आम्हाला कोणाचीही तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या, अशी विनंती पूजा चव्हाणच्या वडिलांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणा आता गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी सपशेल माघार घेतली आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर राजकीय पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडूनही पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी तृप्ती देसाई यांना विनंती केली आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी मी तक्रार देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
एक मुलगी गेली मात्र मला पाच मुली आहेत आम्हाला जगू द्या आम्ही यातून आता सावरलो आहोत. मला कोणाबद्दलही तक्रार द्यायची नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार, असा समजलं जात आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं आहे. पण विलासही गायब असल्याने हा विलास कोण आहे? तो कुठे आहे? याबाबतचं कोड अद्याप उलगडलं नाहीये.
थोडक्यात बातम्या –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन राऊत यांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय
गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!
पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!
“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक