Top News महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

मुंबई | सध्या ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते अनेक प्रकारच्या टीका करताना दिसतं आहे. अशातच भाजप नगरसेवकांना सल्ला देताना भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पुण्यातील ते बोलत होते.

निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं रहात असतात मात्र ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेनेनं निवडणुकीआधी 100 युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं आश्वासन पाळलं नाही. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढलं, असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, आमच्या कागलमध्ये तर पुरात एकाच घर वाहून गेलं होतं. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं वीज बिल आलं. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का?, असा सवालही पाटलांनी केला.

थोडक्यात बातम्या-

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या