बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारनं कृषी विधेयक मागे घ्यावं-राजू शेट्टी

मुंबई | सध्या राज्यात अनेक मुद्यांवरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक वाद-विवाद होत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आज महाविकास आघाडी सरकारमधील सगळ्या पक्षांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत विचारविनिमय करण्यात आला आहे.

त्यावरून केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. यावर्षीच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.  बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मागील आठवड्यात आम्ही शेतकरी संघटनांच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटलो असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच, अशा प्रकारचे विधेयक मांडू नका, असं सांगूनही त्यांनी ते मांडले. केंद्रीय कायद्यांमध्ये दुरूस्ती करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र कायदा करा. जेणेकरून हे तिनही कायदे निष्रभ झाले पाहिजेत, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा करावा, अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे यापूर्वी राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब सरकारने अशाच पद्धतीने विधिमंडळात विधेयके मंजूर करून घेतली होती. परंतू तिन्ही राज्याच्या राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली नसल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार’; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, अशा प्रकारे पाहा निकाल

महाविकास आघाडीत कुरघोडी सुरुच, सरकारमधील 8 आमदार नाराज

“सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?”

शासकीय वाहने मिळूनही अधिकाऱ्यांनी घेतला वेगळा वाहन भत्ता; पुणे पालिकेला लाखोंचा भुर्दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More