बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

नांदेड | सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध चालू आहे. काही दिवसांपासून राज्यासह देशात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आताही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षणावरून भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवणं गरजेचं आहे. संसदेनं राज्यांना अधिकार देण्याबाबतची घटना दुरूस्ती होत असताना ही मर्यादा शिथिल केली असती तर मार्ग मोकळा झाला असता. पण आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्याचा वापर करायचा, हाच भाजपचा उद्योग आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देगलूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा चांगलीच जुंपली आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावर काही दिवसांपुर्वी चर्चा सुद्धा झाली होती. पण केंद्र सरकारनं यावर काही कारवाई केली नाही, अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. संपुष्टात आलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवणं हे सत्ताधारी महाविकास आघाडीसमोर सर्वात मोठं आव्हान आहे.

 

थोडक्यात बातम्या 

पुन्हा राज्यानं पाहिला नानाभाऊंचा कणवाळूपणा! लोककलावंताला दिलं हक्काचं घर

विराट कोहलीने ठोकलं दमदार अर्धशतक! पाकला दिलं ‘इतक्या’ धावांचं आव्हान

लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपीला झाली डेंग्युची लागण

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More