बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला तुम्हाला सोडायचं नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका- जयंत पाटील

लातूर | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील सर्व निवडणूका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सल्ला दिला आहे.

काँग्रेसला आम्हाला सोडायचं नाही. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 25 जून रोजी औसा येथे एका कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. सध्या मराहाष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत. त्यावर काय बोलावं म्हणून आम्ही गप्प आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.

तुम्हाला आम्हाला कधीच दूर करायचं नाही. तुमच्याशिवाय आमचं नाही आणि आमच्याशिवाय तुमचं नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहोत. त्यामुळे आमच्या मनात वेगळे असं काही नाही. आम्हालाही तुमच्याबरोबर जायचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान केले जाणार असल्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठीही हे सरकार प्रयत्नशील असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, जयंत पाटील यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठीच्या चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. राज्य भरातील ओबीसी नेतृत्त्व ठरवून मोडीत काढणारा भाजप आज ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या-

‘बघून घेऊ’, अनिल देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

बियाणे, युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का?- रणजित बागल

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More