“घातपाताची आम्हाला शंका होती, आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते अन्…”
मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप अतिशय आक्रमकपणे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यातच मुंबईत भाजपकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
आम्हाला पोलिस स्टेशनला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. आम्हाला बसवून ठेवून वरिष्ठांशी चर्चा केली. आम्हाला अटक दाखवून पोलिसांनी सोडून दिलं. जनतेच्या दबावाची भीती होती त्यामुळे आम्हाला सोडून द्यावं लागलं, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. पोलिसांचा घातपात करण्याचा विचार होता की, काय अशी आम्हाला शंका होती, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
ज्याप्रमाणे नाक्यावरचे चोर आणि दरोडेखोर जसे पकडतात तसे आम्हाला नेण्यात आलं. पाच मीटरचं अंतर पाऊण तासावर गेलं. आम्हाला घेवून जाताना मध्येच ब्रेक मारणं असे प्रकार सुरू होते, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते, असंही प्रविण दरेकरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, हा भाजपचा मोर्चा आहे. हा जनतेचा मोर्चा आहे. मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने लोक आझाद मैदानात येत आहेत. दहशतवाद्यांशी साटलोट असणाऱ्या लोकांना हा देश कदापिही माफ करणार नाही, असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी केला आहे. त्यातच भाजप नेत्यांना काही वेळ पोलिसांनी पकडल्याने प्रवीण दरेकरांनी गंभीर आरोप केले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“1993च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या, उद्धवजी मांडीला मांडी लावून…”
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ सुट्या, केंद्र सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
“उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल तर सोडून द्या, सरकार तुम्हाला… “
“शरद पवार महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेत”
“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”
Comments are closed.