विदेश

कोरोना इतक्यात जग सोडून जाणार नाही, आपल्याला आणखी भरपूर मोठा पल्ला गाठायचाय- WHO

नवी दिल्ली | जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सगळ्याच देशांना गंभीर इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस इतक्यात तरी जगाचा पाठलाग सोडणार नाही. त्यासाठी आपण चूक करता कामा नये. आपल्याला आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

जे देश आपण कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे. तसंच आफ्रिका आणि अमेरिकेतही चिंताजनक वाढ झाली आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

जगात 25 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर पावणे 2 लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाचं संक्रमण आणखीही सगळीकडे सुरूच आहे. त्यामुळे आपण लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत तर आपण खूप मोठी चूक करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मागे वळून पाहताना आम्ही अत्यंत योग्य वेळी आणीबाणी जाहीर केली असं वाटतं. सर्वांनाच तयारी करण्यासाठी खूप वेळ मिळाला होता, असं सांगायला देखील टेड्रोस विरसले नाहीत.

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केला विशीतला फोटो, आताच्या अभिनेत्रींना लाजवेल असं सौंदर्य

बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही?; राम शिंदे यांचा सवाल

कोरोनाला घाबरवण्यासाठी टिकटॉकवर बनवलं गाणं, आतापर्यंत ५ कोटी लोकांनी पाहिलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या