बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

आधी भाजपच्या तीस जागा, त्यातील 7 जागा कमी झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत. या 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांना सोपवण्यात आली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दसरा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून शिबिरे सुरू करण्यात येणार आहेत. पक्षाने पुर्ण ताकदीने निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. आघाडी आणि युतीच्याबाबत स्थानिक पातळीवर ज्या जिल्ह्याची परिस्थिती असेल त्याप्रमाणे सगळे अधिकार खालच्या पातळीवर देण्यात आले आहेत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सणासुदीचे दिवस असल्यामुळे दुकाने आणि हॉटेलच्या वेेळेत वाढ करण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे, असं नवाब मलिकांनी सांगितलं. यावरून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

बिअर पिणाऱ्यांनो सावधान, अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

“सावरकरांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे, आता सावरकरांचं युग येतंय”

‘…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नौटंकी सुरू आहे’; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More