पुणे | इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आज आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून याठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. ज्यावेळी देशावर हिरवं संकट आले होतं त्यावेळी त्याच्या चिंधड्या करण्याचं काम छत्रपतींनी केलं. आमचे विचार भगवा आहे, आमच्या धमन्यात भगवा असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, शिवरायांच्या चरणी आज मी एकच मागितलं आहे. प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक पाऊली आम्हाला तुमचं मार्गदर्शन राहू द्या. जनतेला अपेक्षित सरकार आल्यामुळे आज ही गर्दी दिसतेय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार राहतील”
शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडकणार भगवा
महत्वाच्या बातम्या-
शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिली खास मानवंदना
शिवरायांवरील स्टेटस व्हिडीओ टिकटाॅकसह सोशल मीडियात ठरतायेत सुपरहिट
कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
Comments are closed.