बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाही”

सातारा | मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालंच पाहिजे, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलीये,त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही, असं उदयनराजे म्हणाले.

आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना?, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण…- संभाजीराजे आक्रमक

रायगडावर संभाजीराजेंची गर्जना, पहिल्या मराठा मोर्चाची तारीख अन् ठिकाणही ठरलं!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More