पुणे महाराष्ट्र

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

पुणे | राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र आता माझं वक्तव्य उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं करायचं हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. त्यामुळे शिवसेनाच काय इतर दुसऱ्या कोणालाही आमचा सरकार स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिवसेना नगरसेवक फोडले; सिन्नरमध्ये ‘पारनेर’ची पुनरावृत्ती!

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस लाखमोलाची मदत

अयोध्येत बुध्दविहार व्हावं, त्यासाठी आंबेडकरी नेत्यांनी लढा देणं गरजेचं- गायक आनंद शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या